“माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मातरांवर ह्रदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे”
प्राणी पाळायला व तयांची काळजी घ्यायला सर्वांनाच आवडते .कोणी मांजर पाळते ,कोणी कुत्र पाळते, तर कोणी कासव पाळते. कुत्रा माझा आवडता प्राणी आहे .आपण सर्वांनाच माहीत आहे की कुत्रा इमानदार व निष्ठावंत प्राणी पैकी एक आहे .पाळीव प्राणी म्हणून देखील हॉस्पिटलच्या ,दुकानांच्या आणि घराच्या संरक्षणासाठी पहारेकरी म्हणून कुत्रा सर्वात जास्त राखला जाणारा प्राणी आहे.
माझ्या कुत्र्याचे नाव ब्रूनो आहे जो जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा आहे .तो जेव्हा दोन महिन्यांचा होता तेव्हा माझ्या मामाने त्याला घरी आणले होते. तो लहानपणापासूनच खूप खेळकर व खोडकर होता. आजीने त्यासाठी गादी आणली होती, पण तो कधीच त्यावर बसत नसे; त्याला मोकळ्या फरशीवर खेळायला आवडायचे. तो लहान असताना उड्या मारायला शिकला. मामा ब्रूनोला दररोज डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार द्यायचा.
काही महिन्यांनंतर तो खूप मोठा झाला ब्रूनो भुंकायचा तेव्हा सगळी लोक घाबरून जायचे त्यासाठी घरच्या पोर्चमध्ये खूप मोठे व अलिशान घर बांधले त्यामध्ये त्याला खाण्याची व पिण्याची सोय केली होती .ब्रूनोला लहान मुलाससोबत खेळायला आवडत असे. पण त्याचा मोठ्या आवाजाने मुले घाबरून जात असे. त्याला आम्ही दिवसातून दोन तास मोकळा सोडायचो. तेव्हा तो खूप खेळत असे.
तो आजी सोबत लपा-छुपी खेळायचा. तो इतका हुशार आहे कि तो आजीचा पाय बघून आजीला शोधायचा .आजी घराच्या बाहेर आली की तो उड्या मारायचा कारण त्याला माहीत होते आजी आली की तो मोकळा.
ब्रूनोचा आवडता खाऊ म्हणजे त्याचे प्रोटीन बिस्केट. ‘ब्रूनो बिस्किट’ असं म्हटलं की तो लगेच शांत बसायचा .लहान मुलं पण ब्रूनोला प्रोटिन बिस्किट द्यायची. एके दिवशी मामा ब्रूनोला कार मध्ये शेतात घेऊन गेला. त्याला खिडकी बाहेरच दृश्य खूप मनमोहक वाटत असे. शेतामधली गाय पाहून ब्रूनो खूपच घाबरला, त्याला ट्रैक्टर च्या आवाजाची पण भीती वाटत असे.
असा हा आमचा लाडका ब्रूनो ,तो खूपच प्रेमळ व प्रामाणिक आहे. आजीला ब्रूनो शिवाय करमत नाही आणि ब्रूनोलाही आजी शिवाय करमत नाही. त्याला अंघोळ घालताना तो खूप उड्या मारतो आणि आजीच्या अंगावर पाणी उडवतो .जेव्हा डॉक्टर ब्रूनोला इंजेक्शन द्यायला येतात तेव्हा ब्रूनो घराबाहेर येतच नाही अशाप्रकारे ब्रूनो मुळे आमचा वेळ जातो व खूप आनंदमय वातावरण असते.
— Mitali Mali
(St. Josephs, Navi Mumbai)
Reference: MarathiNibandh