Pavsalyatil Ek Divas Marathi Nibandh Best Nibandh In 200+ Words

Pavsalyatil Ek Divas Marathi Nibandh 

पावसाळा ऋतूंचा राजा म्हटला‌ जातो | भारतात पावसाळा जून महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर पर्यंत असतो | पावसाळा हा ऋतू सगळ्यांच्या मनाला सुखावणारा असतो कारण भयंकर उष्णता आणि गर्मी पासून पावसाच्या शीतल लहरी आपली सुटका करतात | पावसाळ्यातले दिवस मनमोहक व अविस्मरणीय असतात |


मलाही पावसाला ऋतू खूप आवडतो | माझ्या आयुष्यातही पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे |
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले,
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले |
— कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तींनी मनात घर केलं होतं | बाहेर अंधारून आले होते | मी खिडकीतून बाहेरचे वातावरण पाहत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता | वादळ येण्याची शंका मनात येत होती, तितक्यात दार जोरात बंद झाल्याचा घरापासून आकाशात आवाज कानावर पडला | काही अंतरावरच्या मैदानात धूळीचा लोट आकाशात उडला |

आकाशात वीजा चमकू लागल्या व रानातच वर्षाव सुरू झाला | 


मातीचा सुगंध मनात दरवळू लगला व पहिला पाऊस अनुभवण्यासाठी माझे हात खिडकीतून बाहेर सरसावले | काही वेळ असेच बाहेर पाहत राहिल्या नंतर पावसाच्या सरी अंघावर घ्याव्याश्या वाटल्या व मी लगेच घरा बाहेर पडले | मी त्या पावसात मनसोक्त भिजले | आजूबाजूचे वातावरण अगदी मनाला भावून टाकणारे झाले होते |

हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत, पावसाचे मुक्त, बरसणारे रूप अनुभवत माझी पावले घराच्या दिशेने वळली | जणू
‘श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा,
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा ||
असा प्रत्यय मी त्या दिवशी अनुभवला |

                                                                                                    —–Srushti Shelar

                                                                                    (St. Josephs, Navi Mumbai)

Leave a Comment