Occult of the Tree Best Marathi Nibandh In 500+ Words| वृक्षाचे मनोगत

Occult of the Tree
Occult of the Tree

Occult of the Tree

इकडे पहा, घाबरू नकोस. मी हो इकडेच. अरे तुला नुकसान नाही पोहोचवणार. मी वृक्ष. ये तुला मी माझी गोष्ट सांगतो.

जेव्हां होईल झाडांमधे वृध्दी, तेव्हांच वाढेल जीवनात समृध्दी ”  

भूमितलावर सडक उभे राहणे हे माझे नशिब. माझे पाय जमिनीत खोलवर रुजले असले तरी माझे हृदय मात्र वेलीवर नाट्य करते. माझ्या फांद्या वाऱ्याच्या तालावर लहरतात, पानांची सरसराट ऐकत राहतो. मी वृक्ष, निसर्गाचा अनमोल भाग, माझं मन आज तुमच्यासमोर मोकळं करतोय.

एका बऱ्याच काळापूर्वी जवळच्याच गावकऱ्याने माझी लागवण केली. तोच माझा जन्म. माझ्याबरोबर माझ्या मित्रांचीही लागवण केली गेली होती.

लहान कोंब होताना माझी जगण्याची इच्छा होती. सूर्यप्रकाशाचा थोडा अंश मिळावा म्हणून मी मातीतून डोकावत राहायचो. पावसाची थेंब माझ्या अंगावर येऊन मला मोठं व्हायला मदत करत होती. माझी वाढ हळूहळू होऊ लागली. २० वर्षांनंतर माझं एका तब्बल प्रचंड वृक्षामधे रूपांतर झालं. आज मी मोठा झालोय, माझ्यावर विविध पक्षांची घरे तयार झाली आहेत. माझ्या फांद्यावर माकडांचा खेळ, गिलहरींची उड्या चाल बघून माझं मन प्रसन्न होते.

वृक्षस्य महत्त्वम् अतीवम् यो जानाति स पण्डितः

त्या काळी माझे सर्व मित्र माझ्या बरोबरच होते. माझ्यावर चिमण्यांची / घरटी सुद्धा होती. तेव्हा माझ्या आयुष्याचा सुवर्णकाळ सुरू. उन्हाळ्यात मी माझ्या सावलीने थकलेल्या (वाटसरूंना सुद्धा) आधार देत होतो. सूर्याची तीव्र किरण माझ्यावर पडतात पण मी त्यांच्या झळा सहन करतो. माझ्या पानांच्या विरवणाने मला वातावरण थोड थंड ठेवायचे असते. पावसाळ्यात माझी पाने चमचमीत होतात. आकाशातील ढग झळाळतात, वीजांचा कडकडाट होतो पण मी अढळपणे उभे राहतो. शरद ऋतूत मी माझ्या सुंदर रंगीबेरंगी पानांनी जगाची शोभा वाढवतो. हिवाळ्यात थंडीचा कडा थोडासा जाणवतो पण माझी पाने गळून पडली तरी आतून मी पुन्हा येणाऱ्या वसंतऋतूची वाट पाहत असतो.

माझ्या आयुष्यात मी अनेक गोष्टी बघितल्या आहेत. मानवजातीचा विकास, त्यांची राहणी, तंत्रज्ञान, युद्ध आणि शांतता. काही वेळा माणसं माझ्या फांद्या तोडतात, माझ्या मुळांना हानी पोहोचवतात. मी माणसाला सावली देतो, शुद्ध हवा देतो, फळं देतो पण बदल्यात मला काय अपेक्षा? माझ्या अस्तित्वाची थोडीशी थोडीशी काळजी घ्या.

In this image the Tree is there
occult of the tree

झाली एकविसाव्या शतकाची सुरुवात आता सर्व काही बदलू लागलं होतं. निसर्गाकडे माणसाची वृत्ती बदलू लागली होती. माणूस आता प्रगती करू लागला होता. प्रगतीच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड करण्यात माणूस सज्ज झाला होता.

वृक्षवल्ली आम्हां पक्षी ही सोयरी वनचरे, सुस्वरें आळविती

यामुळेच जगात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ होऊ त्यागली. यामुळे संपूर्ण जगातील सामुद्रय पातळीत वाढ होऊ लागली. हे सर्व माणसासाठी वाईट आहे. वृक्ष हे माणसाला सर्व काही पुरवतात. तरीही माणूस त्यांच्याशी असा गैरव्यवहार करत आहे.

माझ्यासारखे झाड माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत. मी तुमच्यासाठी हवा शुद्ध करतो, पाण्याचा साठा जमिनीत जिरवण्यास मदत करतो आणि पृथ्वीच्या तापमानात संतुलन राखतो. माझे महत्त्व लक्षात घ्या आणि माझ्यासारख्या वृक्षांची जपणूक करा. येणारी पिढी निरोगी आणि सुंदर जगात राहू शकेल यासाठी आपलं आणि माझं एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे.

करा आम्हां वृक्षांवर माया, देऊ तुम्हा आनंदाची छाया

Also Read Our Related Post

माझी माणसाला केवळ एकच विनंती आहे, “तुम्ही जगा व आम्हालाही जगू द्या “https://www.youtube.com/watch?v=HCWkyEq1Bdo

FAQ's

frequently asked questions

वृक्षाचे मनोगत काय आहे?

वृक्षाचे मनोगत एक काव्यात्मक लेखन आहे ज्यामध्ये वृक्ष मानवांसोबत त्यांच्या नात्याबद्दल विचारतो आणि त्याच्या अस्तित्वाच्या महत्वावर प्रकाश टाकतो. हे निबंध वृक्षांच्या दृष्टिकोनातून लेखलेले असते.

वृक्षाचे मनोगतामध्ये मुख्यतः पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्व, वृक्षांचे जीवन आणि मानवाच्या जीवनावर त्यांचा प्रभाव या विषयांवर चर्चा केली जाते. वृक्षांच्या अडचणी आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना यावरही विचार केला जातो.

 

वृक्षाचे मनोगतातील मुख्य संदेश म्हणजे वृक्ष आणि पर्यावरणाचे संरक्षण किती आवश्यक आहे आणि मानवांचे जीवन वृक्षांवर किती अवलंबून आहे हे स्पष्ट करणे.

Leave a Comment