गटारी अमावस्या आणि दीप अमावस्या: महत्त्व आणि पारंपरिक रिती

This image is about gatari amavasya

Why Gatari Amavasya is Celebrated? गटारी अमावस्या का साजरी केली जाते?

         गटारी अमावस्या हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो, याला तेथील लोकांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा सण मेजवानीचा, उत्सवाचा आणि सामुदायिक बंधनाचा काळ आहे. गटारी अमावस्या ही एक कालपरंपरा ,स्वच्छता आणि तयारीचा दिवस म्हणून सांस्कृतिक महत्त्व आहे. श्रावण  महिन्याच्या  आदल्यादिवशी गटारी अमावस्या  व  दिप अमावस्या साजरी केली जाते . गटारी अमावस्येला  मांसाहारी प्रेमींसाठी  मेजवानी  व लोक पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.  गटारी अमावस्या  म्हणजे गता आणि हारी असे संबोधले जाते . कारण  गता आणि हारी म्हणजे होउन गेले हा शब्द जाउन  त्या जागी  गटारी हा शब्द प्रचलित झाला .

           आपल्याकडे उत्सव, व्रतवैकल्य, समारंभ  श्रावण  महिन्यात  साजरे  केले जातात . या  महिन्यात मांसाहार  पचायला जड जातो. आणि गणेश चतुर्थी हा सण असल्यामुळे मांस खात नाहीत . गटारी अमावस्या  हा श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी स्वादिष्ट मांसाहाराचा आनंद घेण्याचा दिवस आहे . 

 

 

Gatari Amavasya 2024:

        आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागते ते श्रावण मासाचे. श्रावण मास सुरु होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. याला गटारी आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते.
         या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावणमास सुरु होतो. या काळात अनेकजण मासांहरी पदार्थ खाण्यास टाळतात. त्यासाठी या अमावस्येला नॉन व्हेज (मासांहरी) प्रेमी मासांहरी पदार्थांवर ताव मारताना दिसतात. गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो. गटारी अमावस्या  ही उत्तर भारतात “हरयाली अमावस्या “ ह्या नावाने साजरी केली जाते. हरियाली अमावस्येच्या दिवशी लोक भगवान शिवची पूजा करतात . मुबलक कापणी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी शिव मंदिरात विशेष प्रकारची पूजा किंवा समारंभ केले जातात. श्रावण महिन्यात महाराष्ट्रीय लोक विविध प्रकारचे अन्न वर्ज्य करण्याचे कारण म्हणजे, पावसाळा त्याच्या शिखरावर आहे आणि हा कालावधी असा मानला जातो ज्या वेळी पोटाला वेगवेगळ्या आजारांची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे श्रावण महिन्यात लोकांना भोगावर नियंत्रण ठेवावे लागते .

This image is about gatari amavasya

आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या का म्हणतात?

         मराठी कालानिर्णयनुसार आषाढ महिन्यात अमावास्येला प्रामुख्याने गटारी अमावस्या  साजरी केली जाते . श्रावण महिन्यात नॉनव्हेज (मांस मच्छी)खाल्ले जात नाही . श्रावण महिन्यात महादेवाची, हनुमानाची व इतर देवीदेवतांची देखील आराधना केली जाते . नॉन व्हेज (मांस मच्छी) आणि कांदा लसूण असे तामसिक पदार्थ  खाल्ले जात नाही . याच दिवशी दीप अमावस्या सुद्धा साजरी केली जाते . संध्याकाळी दीप  पूजन करण्यात येते . दिव्यांची आरास केली जाते . भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्ये दिवशी पूजा केली जाते .

गटारी अमावस्येचे महत्त्व:

           हिंदू धार्मिक सणातील श्रावण महिन्याला आध्यात्मिक खूप महत्त्व दिले जाते . या सर्वांमध्ये, श्रावण अमावस्या ही पवित्र श्रावण महिन्यात येते म्हणून मोठ्या भक्तिभावाने पाळली जाते. या सणाला खूप महत्त्व आहे. गटारी अमावस्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जसजसा श्रावण महिना जवळ येतो तसतसे अधिकाधिक मांसाहार प्रेमी नॉनव्हेज (मांस मच्छी) खातात आणि दिवसभर मज्जा करतात, त्यानंतर श्रावण महिन्यात मांसाहार करणे बंद केले जाते.

          श्रावण महिना हा महादेवाचा आवडता महिना त्यामुळे या महिन्यात, हलके जेवण, शाकाहारी भोजन केले जाते. त्यामुळे हया महिन्यातअमावस्या महत्त्वाची मानली जाते . सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, आराधना आणि नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते . त्याचप्रमाणे आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. देशातील काही भागांमध्ये आषाढी अमावास्या हटके पद्धतीने साजरी केली जाते. याला गटारी अमावास्या असे संबोधले जाते. श्रावण महिना हा पावसाचा असतो. या काळात प्राण्यांमध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असते. तसेच या कालावधीत पचनक्रियासुद्धा मंदावते. त्यामुळे मांसाहार न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

FAQ’s

Frequently Asked Questions 

1. गटारी अमावस्या कधी साजरी केली जाते ?

गटारी अमावस्या श्रावण महिना सुरु होण्याआधी साजरी केली  जाते .

गटारी अमावस्या हा शब्द संस्कृत भाषेतील “गता” या शब्दापासून आला असण्याची शक्यता आहे, ज्याचा अर्थ “गेल्या” किंवा “पुरातन” असा होतो.

सर्वप्रथम पूजा करण्याच्या जागेची चांगली स्वच्छता करावी. देवघराची साफसफाई करून तेथे दीप प्रज्वलित करावे. दीप अमावस्येच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. आपल्या शक्तीनुसार गरीबांना अन्न, वस्त्र इ. दान करावे.

या दिवशी अनुष्ठान केल्याने आपल्या जीवनातील सर्व पैलूंमधील ऊर्जा अवरोध, नकारात्मकता, वाईट आणि कमतरता दूर होतात.

Leave a Comment