google.com, pub-8725611118255173, DIRECT, f08c47fec0942fa0 Best Marathi Nibandh | माझा आवडता छंद 300 + शब्दात - Learn With Shanket

Best Marathi Nibandh | माझा आवडता छंद 300 + शब्दात

 माझा आवडता छंद 300 + शब्दात
माझा आवडता छंद 300 + शब्दात

माझा आवडता छंद 300 + शब्दात

छंद ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे वेळ खर्च करून आपले मन आपल्या आवडत्या कामात रमवतो जसे, नाचणे, गाणे, खेळणे, इत्यादि . तो छंद आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पण मदत करते.

माझा आवडता छंद आहे वाचन . मी लहान असताना माझ्या आजोबांनी मला एक गोष्टीचे पुस्तक मला भेट म्हणून दिले मला ते पुस्तक खूप आवडले . त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी जसे सिंह आणि उंदिर , ससा आणि कासव अशी अनेक गोष्टी होत्या . काही काळानंतर माझ्या आईने अजून एक नवीन पुस्तक दिले ज्याचे नाव होते “टेल्स ऑफ एक अकबर – बिरबल ” . मला ते पुस्तक सुद्धा खूप आवडले. 

एक दिवशी मी एक म्हण ऐकली: 

” रीडींग इज टू माईड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी .”

हे म्हण प्रसिद्ध कवि ‘जोसेफ अडिसन’ यांची आहे . ही म्हण सांगते की आपण व्यायाम करून आपले शरीर मजबूत होते तसेच वाचन करून आपले मन मजबूत होते . काही वर्षानंतर मी एक नवीन पुस्तक घेतले ‘द पावर ऑफ यूअर सबकॉन्शियस माईंड . ‘  त्या पुसकाने मला चेतन मन आणि अवचेतन मन यांमधील फरक पटवून दिले .आपल्या अवचेतन मन मध्ये किती उर्जा आहे ते सुद्धा या पुस्तकाने मला पटवून दिले .

एक वेळी मी अजून एक म्हण ऐकले :

 ” ए रूम विदआउट बुक्स इज लाईक एह बॉडी विदआउट सोल .” 

हे म्हण प्रसिद्ध रोमन लॉयर “मार्कस दुलियस सिसेरो ” यांची  आहे . हे म्हण आपल्याला सांगते की जेव्हा एक रुम पुस्तकांच्या बिना दिसतो तेव्हा असे वाटते जसे एक शरीर आत्माच्या बिना असते .

या कारणामुळे मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके घेतली . त्या पुस्तकांनी मी माझे रूम सजवले . माझे रूम आधीपेक्षा खूप सुंदर दिसायला लागले . वाचनाच्या छंदामुळे मला खूप फायदा होतो. मी वाचनाने निसर्गाबद्दल खूप माहिती काढली आहे . सायकॉलॉजीच्या बद्दल सुद्धा मी खूप माहिती काढली आहे . मला माहित आहे की ही माहिती माझ्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून मला वाचन खूप आवडते .

View Also- Important Marathi Nibandh | मराठी निबंध यादी for 2024

Leave a Comment